Menu

अल्फ्रेड वेगेनर

(Alfred Wegener)

जन्म: ०१ जनेवारी १८८०.
मृत्यू: ०१ नोव्हेंबर १९३०.
कार्यक्षेत्र: भूगर्भशास्त्र.

अल्फ्रेड वेगेनर
Alfred Wegener
जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ
जन्म: 1 जानेवारी, 1880
मृत्यू: नोव्हेबर, 1930

खंडांची निर्मिती उलगडणारा संशोधक

आपली पृथ्वी गोल असून तिचा दोन तृतीयांश हिस्सा जलमय व एक तृतीयांश हिस्सा भूभाग आहे. पृथ्वीचा भूभाग भौगोलिकदृष्ट्या आठ खंडात विभागलेला आहे. परंतु, कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीचा सर्व भूभाग एकसंघ होता आणि नंतर तो खंडामध्ये विभागला जाऊन एकमेकांपासून विलग झाला अशी संकल्पना जर्मन शास्त्रज्ञ अल्फेड वेगेनर यांनी मांडली. यालाच ‘Continental Drift’ म्हणजेच खंडाचे अपवहन असे संबोधले जाते.
अल्फ्रेड वेगेनर यांचा जन्म बर्लिनमध्ये झाला. त्यांचे वडील धर्मगुरू होते. वेगेनर यांचे शिक्षण बर्लिनमध्येच झाले. बर्लिन विद्यापीठातून गणित, निसर्गविज्ञान व खगोलशास्त्र यांचा अभ्यास करून पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी 1904 मध्ये खगोलशास्त्रतच डॉक्टरेट मिळवली. नंतर मात्र या विषयात संशोधन करण्याऐवजी त्यांनी आपल्या भावाबरोबर लिंडेनबर्ग येथील Aeronautic Observatory मध्ये हवामानशास्त्रात वातावरणविषयी संशोधनाला सुरुवात केली. 1906 मध्ये त्या दोघांनी 52 तास ‘बलून’मधून प्रवास करून त्या काळात विक्रम स्थापला होता. नंतर त्यांनी ग्रीनलँड या अतिथं%