Menu

विज्ञानजत्रा, विज्ञानयात्रा

विज्ञान व कला यांचा समन्वय साधणे, विज्ञानप्रसाराला सामूहिक उत्सवाचे रूप देणे आणि आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात विज्ञानाला स्थान मिळवून देणे यासाठीचा कार्यक्रम म्हणजे विज्ञानजत्रा किंवा विज्ञानयात्रा. निरनिराळ्या विषयांमध्ये काम करणारे विज्ञानप्रसारक व वैज्ञानिक यांनी प्रदर्शने, स्लाइड शोज्, प्रेझेंटेशन्स, विज्ञान चित्रपट इ. घेऊन एखाद्या गावी जायचे, वेगवेगळ्या प्रश्नांची वैज्ञानिक बाजू लोकांसमोर आकर्षक पद्धतीने मांडायची, त्या विषयाबाबत लोकांंशी संवाद साधून त्यांच्या जीवनात असलेले विज्ञान समजून घ्यायचे, विज्ञानाच्या नावे एक प्रकारचा उत्सव साजरा करायचा असा हा अभिनव कार्यक्रम.