जन्म: १३ मे १८५७.
मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२.
कार्यक्षेत्र: सूक्ष्मजीवशास्त्र.
रोनॉल्ड रॉस
Ronald Ross
इंग्लिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
जन्म : 13 मे, 1857
मृत्यू : 16 सप्टेंबर, 1932
मलेरियाचे रहस्य उलगडणारा शास्त्रज्ञ
एकेकाळी लाखोंचा बळी घेणाऱ्या मलेरियावर काबू मिळवणे शक्य झाले ते मुख्यत्वेकरून ब्रिटिश डॉक्टर रोनॉल्ड रॉस आणि इटालियन ग्रासी यांनी केलेल्या संशोधनामुळे. रोनॉल्ड रॉस यांनी मलेरियाच्या परजीवी जंतूंच्या जीवनचक्राचे रहस्य प्रथम उलगडून दाखवले..
रोनॉल्ड रॉस यांचा जन्म हिमालयाच्या कुशीत झाला. त्यांचे वडील सर क्रॅम्बेल रॉस ब्रिटिश सैन्यात जनरल सेक्रेटरी होते. खरेतर रॉस यांना डॉक्टर होण्यात रस नव्हता. कवी, कादंबरीकार, चित्रकार, संगीत-रचनाकार असे काहीतरी होऊन प्रतिष्ठा प्राप्त करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी डॉक्टरच व्हावे, असा त्यांच्या वडिलांचा अट्टहास होता. त्यानुसार 1874 मध्ये डॉक्टर होण्यासाठी रॉस लंडनच्या एका हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. वैद्यकीय व्यवसाय परवाना परीक्षा व भारतातील सेवा पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन ते 1884 मध्ये भारतात दाखल झाले. रुग्ण तपासणे, औषधे देणे अशा नित्यक्रमाच्या कामात त्यांचे मन रमत नव्हते. 1889 मध्ये सुट्टीला लंडनला गेले असताना रॉस यांनी सामाजिक आरोग्य या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदविका मिळवली. त्याबरोबरच सूक्ष्मजीवशास्त्राचा एक छोटासा अभ्यासक्रम पुरा करून, सूक्ष्मदर्शक घेऊन व नवीन ज्ञानाने उत्साहित होऊन रॉस भारतात परतले.
यावेळेपर्यंत फ्रेंच डॉक्टर लाव्हेरान याने माणसांना होणाऱ्या मलेरियाच्या परजीवाचा शोध लावल्याला दशक उलटून गेले होते. परंतु, रॉस यांना लाव्हेरानचे म्हणणे मान्य नव्हते. लाव्हेरानचे म्हणणे खोडून काढणारा एक निबंध रॉस यांनी 1893 मध्ये प्रसिध्द केला. रॉस यांचा आत्मविश्वास पाहून लंडनमधील प्रतिष्ठित डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन प्रभावित झाले. डॉ. मॅन्सन यांनी चीनमध्ये असताना फायलेरियाचा (हत्तीरोगाचा) अभ्यास केला होता व डास रक्ताबरोबर फायलेरियाचे कृमी शोषून घेतात व त्याची वाढ डासात होते, हे त्यांनी दाखवून दिले होते. मलेरियाचा परपजीवीसुध्दा डासामार्फत पसरतो, अशी त्यांची खात्री होती. (आदिवासी व प्राचीन वैद्यक शास्त्रांनीदेखील असा संशय व्यक्त केलेला होता. सुश्रुतसंहितेतही त्याचे वर्णन आहे.)
रॉस 1894 मध्ये सुटीवर असताना त्यांनी मॅन्सन यांना भेटावे, असा सल्ला देण्यात आला. रॉस आणि मॅन्सन यांच्या झालेल्%E