Menu

अलेक्सांदर प्रोखोरोप

(Alexander Mikhailovich Prokhorov)

जन्म: ११ जुलै १९१६.
मृत्यू: ०८ जनेवारी २००२.
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञानशास्त्र.

अलेक्सांदर प्रोखोरोप
Alexander Mikhailovich Prokhorov
सोविएत पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ
जन्म : 11 जुलै 1916
मृत्यू : 8 जानेवारी 2002

लेसरचा शोध लावणारा सोविएत शास्त्रज्ञ

“मंगळ ग्रहावरचे हे आक्रमक क्षणार्धात खून कसा पाडतात, हे एक मोठे कोडेच आहे. उष्णतेच्या प्रखर किरणाने ते खून पाडत असावेत. बहुधा ते बहिर्गोल आरशांचा वापर करून आपल्या लक्ष्यावर किरण केंद्रित करत असावेत.” १८९८ साली एच. जी. वेल्स या ब्रिटिश विज्ञान कादंबरीकाराने ‘ग्रहांमधले युद्ध’ या आपल्या कादंबरीत अशा रीतीने ‘मृत्यू किरणां’ची कल्पना मांडली होती. प्रत्यक्षामध्ये मृत्यू किरण म्हणून वापरता येण्याजोग्या लेसर किरणांचा शोध १९६० साली लागला. सोविएत शास्त्रज्ञ अलेक्सांदर प्रोखोरोप व एन. जी. बासव यांनी लेसरचा शोध लावला. (LASER = Light Amplification by Stimulated Emmussion of Radiation). याच सुमारास अमेरिकेतही टी. एच. मायमन यांनी लेसरतंत्र स्वतंत्रपणे शोधून काढले.
लेसर किरणांचा वापर एकीकडे मानवी कल्याणासाठी संशोधन, औद्योगिक व वैद्यकी क्षेत्रात अनेकविध प्रकारे केला जात आहे, तर १९९० मध्ये त्याचा संहारक वापर अमेरिकेने इराकविरुद्धच्या युद्धामध्ये केला. या युद्धात लेसर तंत्राचा पथदर्शनासाठी वापर करून अतिउंचावरून बॉम्बचा इच्छित लक्ष्यावर अचूकपणे मारा केला. लेसरच्या संहारक वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी जगातली जनता जागरूक राहिली नाही तर लेसर हे खरोखरच मृत्यू किरण ठरण्याची भीती आहे.
लेसर संशोधक अलेक्सांदर प्रोखोरोप यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील अॅथरटन येथे ११ जुलै १९१६ रोजी झाला. अलेक्सांदरचे वडील मिखार्सल हे एक रशियन कामगार होते. झारशाहीविरोधी राजकीय संघटनात सामील झाल्यामुळे १९१० मध्ये त्यांना सैबेरियात हद्दपार करण्यात आले होते. त्यांची मैत्रीण मारिया मोठा खडतर प्रवास करून मिखाईलना सैबेरियात येऊन मिळाली व ते विवाहबद्ध झाले. १९११ मध्ये सैबेरियातून धाडसीपणे सुटका करून घेऊन मजल दरमजल करीत ते ऑस्ट्रेलियात पोचले. अलेक्सांदरचे बालपण अतिशय गरिबीत, ना खेळ, ना मित्र अशा वातावरणात गेले. त्यांचे सवंगडी म्हणजे रंगीबेरंगी फुलपाखरे, पक्षी आणि झाडेझुडपे. त्यांचा आवडता खेळ म्हणजे झाडाच्या फांदीवर चढायचे आणि मोठ्या बहिणीला फांदी तोडायला सांगून वायुवेगाने जमिनीकडे झेप घ्यायची.
सोविएत युनियनमध्ये १९१७ साली क्रांती होऊन कम्युनिस्ट पक्षाचे सरकार सत्तेवर आले. साहजिकच, मायदेशी परत जाण्याचे मिखाईल यांनी ठरवले व १९२२ मध्ये ते रशियाला परतले. अलेक्सांदरचे शालेय शिक्षण ताश्कंदला झाले व पुढील शिक्षण लेनिनग्रादला झाले. अलेक्सांदरला रेडिओ इंजिनिअरिंगची लहानपणापासूनच आवड होती. १९३९ मध्ये त्यांनी भौतिकीत पदवी घेऊन पुढील संशोधनाला प्रारंभ केला. जून १९४१ मध्ये जर्मनीने सोविएत युनियनवर अचानक आक्रमण केले तेव्हा लगोलग प्रोखोरोव लष्करात रूजू झाले. या महायुद्धात १९४२ साली जखमी होऊन त्यांचा उजवा हात निकामी झाला. १९४३ मध्ये ते पुन्हा जखमी झाले पण मृत्यूच्या जबड्यातून वाचले. त्यांचे आई-वडील या काळात मृत्यूमुखी पडले तसेच असंख्य मित्र व सहकारी युद्धांत मारले गेले. १९४५ मध्ये लालसेनेने जर्मनीचा पुरा पराभव केला. पण चार वर्षांच्या भीषण युद्धात एका खोलीत अनेक कुटुंबांची दाटीवाटी, संशोधन सामग्री नष्ट झालेली, अशा असंख्य अडचणी उभ्या होत्या. या सर्व आव्हानांना सामोरे जात अलेक्सांदर प्रोखोरोप यांनी आपले संशोधन कार्य जिद्दीने सुरू केले. संशोधनात सैद्धांतिक अचूकता व देशामध्ये व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी ठरेल, अशी दोन्ही बाजूंची सांगड घालण्यावर त्यांचा विशेष भर होता. आयुष्यभर आपल्या संशोधनामध्ये यातला समतोल ते उत्तम तऱ्हेने साधत राहिले. १९५४ मध्ये प्रदोलन (ऑदिलेशन) प्रयोगशाळेचे ते प्रमुख झाले. आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांचे अतिशय खुले व बरोबरीचे संबंध असत. प्रयोगशाळेत किंवा बर्फावर घसरारायला किंवा सहलीला गेले तरी सतत जिवंत चर्चा चाले आणि त्यातून शोध संशोधनाचे काम पुढे जाई.
लेसरवरच्या संशोधनाबद्दल प्रोखोरोव यांना १९६४ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. लेसर म्हणजे उत्तेजित किरणांच्या उत्सर्जनामुळे होणारे प्रकाशाचे वर्धन. या प्रक्रियेद्वारे अत्यंत लहान आकाराच्या परंतु तेजस्वी अशा किरणशलाका निर्माण करता येतात. प्रकाशकिरणे अत्यंत कमी जागेत एकत्रित झाल्यामुळे त्यांची शक्ती लहान बिंदूवर केंद्रित करता येते. या केंद्रिकरणामुळे सूक्ष्म क्षेत्रावर या किरणांचा प्रभाव पाडून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे तो भाग वितळतो किंवा नष्ट होतो.
लेसर तंत्राचे अनेकविध बहुमोल उपयोग आहेत. वैद्यकीय उपचारात रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी लेसर किरण वापरले जातात. ऑप्टिक फायबर रक्तवाहिन्यांमध्ये घुसवून त्याद्वारे लेसर किरणांना मारा रक्ताच्या गुठळ्यांवर करता येतो. त्यामुळे गुठळ्या फुटतात किंवा काही प्रमाणात त्यांची वाफ होऊन अडथळा दूर करता येतो. मधुमेहासारख्या