Menu

युरेका चाचणी

हा औपचारिक विज्ञान शिक्षणाशी जोडलेला कार्यक्रम आहे.

विज्ञानातील विशयांची कप्पेबंद व रूक्ष विभागणी; कल्पनाशक्ती, उत्सुकता, सर्जनशीलता, आनंद, चिकित्सक वृत्तीला वाव नसणे; माहिती आणि स्मरणशक्तीवरचा अवाजवी भर; वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवण्यावर भर नसणे; सुयोग्य सामाजिक संदर्भांचा अभाव अशा स्वरूपाचे दोष शालेय विज्ञान शिक्षणात आढळतात. शालेय शिक्षण जीवनाला, समाजाला भिडणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे असले पाहिजे. हे मोठे काम आहे.

युरेका विज्ञानचाचणी हा त्या कामातला एक छोटासा भाग आहे.

या चाचणीत ३० ते ४० प्रश्न विद्यार्थ्यांना दिले जातात. उत्तरे लिहिण्यासाठी एक महिना दिला जातो. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग, निरीक्षणे करावीत,  शिक्षक, इतर माहितगार (आता गूगल) यांची मदत घ्यावी, आणि उत्तरे लिहावीत अशी अपेक्षा असते. विज्ञानातील निरनिराळ्या शाखांचा परस्परसंबंध समजावा, समाजातील प्रश्नांशी असलेला त्यांचा संबंध मुलांसमोर यावा हा हेतू समोर ठेवून यातील प्रश्न काढलेले असतात.

नमुना युरेका चाचणी

Sample Eureka Test