Menu

बिरजिट व्हेनेसलॅंड

(Birgit Vennesland)

जन्म: १७ नोव्हेंबर १९१३.
मृत्यू: १५ ऑक्टोबर २००१.
कार्यक्षेत्र: जीवरसायनशास्त्र.

बिरजिट व्हेनेसलॅंड
Birgit Vennesland
नॉर्वेजियन – जर्मन जीवरसायन शास्त्रज्ञ
जन्म : 17 नोव्हेंबर, 1913
मृत्यू : 15 ऑक्टोबर, 2001

परखड मतवादी शास्त्रज्ञ

प्रकाशसंश्लेषण ही निसर्गातील सर्वाधिक मोहून टाकणारी प्रक्रिया आहे असे मानणाऱ्या व त्यावरच संशोधन करणाऱ्या बिरजिट व्हेनेसलॅंड यांनी जीवरसायन शास्त्राच्या संशोधनाला सुरूवात केली ती 1939 च्या दशकात. तो काळ विज्ञानातील भारावून टाकणाऱ्या अभूतपूर्व बदलांचा काळ होता. तसेच जीवरसायनशास्त्राचा फारसा विकास झालेला नव्हता. संशोधनासाठी आवश्यक शीत केंद्रोत्सारक (Refrigerated Centrifuge), वर्णपट प्रकाशमापक (Spectrophotometer) यासारखी उपकरणे उपलब्ध होती ती कामचलाऊ पद्धतीने तयार केलेली. जीवशास्त्राकडे ओढा असला तरी त्या संशोधनाला पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राची जोड हवी असे बिरजिट यांना वाटत होते. साहजिकच त्या रसायनशास्त्राकडे वळल्या.
बिरजिट यांचा जन्म नोव्हेंबर 1913 मध्ये नॉर्वेच्या दक्षिण किनाऱ्यावरील क्रिस्तियनसॅंड गावी गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी शेती न करता कॅ%